मालगाडी ने ११ रान डुक्कराला चिरडले
मूल (अमित राऊत)
चंद्रपूर वरुन गोंदियाकडे जाणार्या मालगाडी रेल्वेने बारा रानडुक्कर चिरडल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे मूल पासून जवळच असलेल्या चिचोली गावाजवळ घडली.
बल्लारपूर ते गोंदिया असा रेल्वे मार्ग या भागातून गेला आहे. लागूनच बफरचे जंगल असल्याने येथे वन्य जीव प्राण्यांचा मुक्त संचार आहे. वन्य प्राण्यांची रेल्वे मार्गावरुन आणि रेल्वे रुळावरुन मुक्त पणे भटकंती सुरु असते. आज पहाटे रान डुक्करांचा कळप येथे संचार करीत असताना नेमके त्याच वेळेस गेलेल्या मालगाडी खाली सापडल्या गेला. यात सर्वच बारा रान डुक्कर चिरडल्या गेले. पहाटे घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली. यावेळी चिचोली गावातील आणि मूल मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वनविभागाचे अधिकारी आाणि कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. घटना स्थळाचा पंचनामा करुन त्याच परिसरात बाराही रान डुकराना एका खड्ड्यात गाडण्यात आले. यावेळी मूल येथिल क्षेत्र सहायक खनके, वन कर्मचारी मरसकोल्हे, वन्य जीव अभ्यासक उमेश सिंह झिरे उपस्थित होते.
या आधी सुद्धा केळझर मार्गावरील रेल्वे रुळावर रेल्वेने वाघीण आणि बझडे तसेच अस्वलीस चिरडल्याची घटना घडलेल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!