शिवणी येथील अंगणवाडी सेविकांच्या विरोधात तक्रार दाखल

पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत शिवणी येथील अंगणवाडी सेविकांच्या विरोधात तक्रार दाखल


शिवणी/वासेरा (सचिन रामटेके)
सिंदेवाही:-पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असल्यासलेल्या बफर झोन क्षेत्रातील शिवणी येथील अंगणवाडी क्र.१ च्या सुमन बाई हेडाऊ यांच्या विरुद्ध त्याच अंगणवाडीतील स्तनदा माता व अमृत आहार योजनेतील महिला लाभार्थी नि बालविकास प्रकल्प सिंदेवाही येथे तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी सेविका नि स्तनदा माता अमृत पोषण आहार लाभार्थीच्या घरी जाऊन द्यायचे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही अंगणवाडी सेविका हेडाऊ यांनी शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवत स्तनदा माता पोषण आहार चे वाटप महिला लाभार्थी चा जीव धोक्यात घालून चक्क रस्त्यावरच वाटप करत असल्याचे धक्कादायक बाब घडली आली आहे, कधी आपल्या घरी तर कधी रस्त्यात जेवणाची डब्बे व अंडे वाटप करण्यात आले यामुळे महिला लाभार्थींना विवंचनेत होत्या की नेमकं जायचं कुठे यामुळे त्यांच्या घरी पोषण१७/६/२०२० आहार साठी गेले असता माझा वेळ संपला अस मनुन शिवीगाळ करू लागल्याने महिलांनी त्यांची तक्रार दाखल केली आहे.
सदर अंगणवाडी सेविका पोषण आहाराचं वाटप लाभार्थी पर्यंत पोचवत नसून अश्या अंगणवाडी सेविकेवर कृपा दृष्टी कुणाची असा प्रश्न पडला असून या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी महिला व बालकल्याण विभाग चंद्रपूर इथून व्हावी चौकशी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करून अंगणवाडी कार्यकर्तीवर शिस्त भंगाची कारवाही करून तात्काळ निलंबनाचे कारवाही कारवाही .
महामारी कायदा १८९७ अंतर्गत स्तनदा मातांची आरोग्याशी खेळ करणाऱ्या सेविकेची चौकशी करावी सदर कारवाही तात्काळ करावी अन्यथा जनतेने कायदा हातात घ्यायला वेळ लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!