नागभीड तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा हैदोस - भाऊराव डांगे
नागभीड (यश कायरकर)
दारू तस्कर मस्त, पोलिस प्रशासन सुस्त, सामान्य नागरिक त्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून नागभीड तालुक्यात भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सिमा बंदी असतांना देशी व विदेशी दारूची चोरट्या मार्गाने दारू आणून सर्रास विक्री केली जात आहे. नागभीड पोलिस स्टेशनचे पोलिस प्रशासन सुस्त बसले आहे. कोरोना लॉकडॉऊन असतांना अनेक ठिकाणाहून दारू तस्करांसोबत पोलिसांचे काही साटेलोटे आहेत का? असा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे
नागभीड तालुक्यात प्रत्येक गांवात अवैध दारूचा व्यवसाय जोरात फोफावत आहे. यामुळे सामाजिक भांडणे निर्माण होत आहेत. लोकांचे आरोग्यास धोका आहे. कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे नादात बेरोजगार युवक व महिला अवैध दारू व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. याचा परिणाम शाळेतील मुले व जनसामान्यांवर होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ५ वर्षांपूर्वी बंद झालेली दारू फसवी दारूबंदी योजना पूर्णपणे बंद करा. शासनाचा महसुल वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व पुरवठा करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, अथवा जनआंदोलन करण्यात येईल असे भाऊराव डांगे, ज्येष्ट राष्ट्रवादी कार्यकर्ता नागभीड शासन व प्रशासन इशारा दिला आहे. तस्करांची दारू चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोणाच्या आशिर्वादाने येते याचा शोध घ्यावा.
अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवा असे आज पत्रकार परिषद घेऊन सामान्य जनतेला जो त्रास होत आहे याला वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी खालील स्थानिक नागरिक उपस्थित



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!