बंदर कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्याची पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचेकडे इको-प्रो ची मागणी





चंद्रपूर : मोहम्मद सुलेमान बेग

पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठविले निवेदन

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या बफर सिमेस लागून बंदर कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यात यावे या मागणी करिता वेग वेगळे आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 24/06/2020 रोजी जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांना लिलाव रद्द करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. तर राज्य सरकार च्या वतीने या प्रकरण मध्ये हस्तक्षेप करित केंद्र सरकार कड़े लिलाव रद्द करण्याची मागनीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कड़े इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी दिले आहे. यावेळी इको-प्रोचे अमोल उत्तलवार, राजू काहीलकर व सचिन धोतरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!