सोशल डिस्टन्सींग चे नियम धाब्यावर प्रतिक्षा नगर ही मिश्र वस्ती आहे येथे हायप्रोफाईल लोक
सोशल डिस्टन्सींग चे नियम धाब्यावर
प्रतिक्षा नगर ही मिश्र वस्ती आहे येथे हायप्रोफाईल लोक
राहतात. जजेस सोसायटी मोठ्या मोठ्या मिडिया चॅनलमधे चमकणारे संपादक आणि पत्रकार यांच्या सोसायट्या, मंत्रालय विधिमंडळाचे ऊच्चपदस्थ अधिकारी, जनता दलाचे अध्यक्ष माजी आमदार शरद पाटील (माऊली सोसायटी ) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड( H-10) यांची निवासस्थाने येथे आहेत. तसेच ट्रॅन्झिस्ट कॅप मधे राहणारे सुशिक्षित लोक राहतात.
याच प्रतिक्षा नगर येथील रघुनाथ चव्हाण मैदानाच्या बाहेर आज सकाळी बाजार भरला होता. अशा प्रकारच्या बाजारातून करोना बाजार मांडणार इतकेच नव्हे तर प्रतिक्षा नगर मध्ये ठाण मांडणार फेरीवाल्यांच्या पोटाचा प्रश्न आहे हे महत्वाचे आहे त्याच बरोबर प्रतिक्षा नगर येथील प्रत्येकाच्या जिवाचा प्रश्न आहे. आणि तो सर्वात महत्वाचा आहे. सरकारने लाॅकडाऊन उठविले याचा अर्थ भाजीपाला, मासोळी चिकन, मटकन यासाठी गर्दी करणे नव्हे सोशल डिस्टन्सींग चा नियम पायदळी तुडविला जात असेल तर करोना पसरणार हे अंतिम सत्य. महापालिका प्रशासनाला विनंती आहे की सर्व फेरीवाले यांच्यासाठी अशोक पिसाळ मैदान येथे तात्पुरते मार्केट उपलब्ध करून दिले होते. आता पावसाळ्यात मैदानात फेरीवाले बसू शकत नाहीत तरी मैदानाच्या बाहेर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मैदानात भरत असलेला बाजाराची सुविधा सोशल डिस्टन्सींग चे नियम पाळून उपलब्ध करून द्यावी. बाजाराचा परिसर सॅनिटायझर ने निर्जंतूक करावा.शाॅप अॅड एस्टाब्लिशमेंट चे परवानाधारक अधिकृत दुकानदार, अनधिकृत स्टाॅलधारक,
प्रत्येक फेरीवाल्यांचे कंपलसरी कोविड19 चाचणी करून कोविड19 चा संसंर्ग नाही याची खात्री करून भाजी वा अन्य पदार्थ विक्री करण्याची परवानगी द्यावी काही लोक वडापाव, ईडली सांबार खाण्याचे पदार्थ विकत आहेत. WHO जागतिक आरोग्य संघटनेने कोविड19 च्या पार्श्वभूमीवर बेकरी प्रॉडक्ट पाण्याने स्वच्छ धुवून नंतर खाता येत नसल्याने ते खाण्यावर बंदी घातली आहे. कारण पाव बटर टोस्ट हे पदार्थ आपण धुवून खाऊ शकत नाही. त्यावर बंदी घालावी. महापालिकेची गाडी वा पोलीसांची गाडी आली की फेरीवाले पळून जातात. गाडी गेली की पुन्हा बाजार मांडतात. यातून तुम्ही महापालिकेच्या अधिका-याना फसवाल पण करोनाला फसवू शकणार नाहीत. तो एका व्यक्तीमुळे तो संपूर्ण कुटुंबाच्या उरावर बसणार.
प्रत्येकाने कोविड19 चा कायदा आणि नियम पाळायला हवेच आपले लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनी जिवाची जोखीम घेऊन कोविड19 मध्ये गेले 3 महिने खूप काम केले ते याचसाठी की करोना पसरू नये म्हणून आता ते सर्वच जण थकले आहेत थकलेल्या सैनिकांना काही काळ आरामाची गरज असते. हा प्रश्न सामाजिक आरोग्याचा असल्याने महापालिका प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे हाच करोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा एकमेव महामार्ग आहे. सर्वानी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यातूनच आपोआप समाजाची काळजी घेतली जाईल. सामाजिक दायीत्वाचे खंदे पुरस्कर्ते उद्योगपती सन्माननीय श्री रतन टाटा सर यांनी एक संदेश दिला तो म्हणजे या मारामारीच्या संकटातून स्वतःला वाचवणे आणि जगणे. प्रतिक्षा नगर येथील जनता well educated आहेच आणि समजदार देखील. तेव्हा प्रत्येकाने आपला रोल निश्चित करावा Self Voluntareesm प्रत्येकाने एक स्वयंसेवाभाव, स्वयं शिस्त यांना आपलेसे केले पाहिजे.
पुन्हा एकच विनंती अगदी महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा. गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळा आणि यातूनच करोना चा प्रादुर्भाव टाळा. याचे कारण हॉस्पिटल मधे बेड ऊपलब्ध नाहीत. ऊपचार मिळण्यास उशिर होतो. परिणामी प्रकृती खालावत जाते आणि शेवटी मरणाच्या दारात पोहोचतो. त्याकरिता गर्दीत जायचे की घरात थांबायचे याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हा निर्णय म्हणजे शेवटी जिवन मरणाचा निर्णय आहे.
अनिल म्हात्रे
(लेखक हे सोशल वर्कर आणि मुक्त पत्रकार आहेत)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!