बोगस बियाणांपासून सावध असावे. श्री.प्रशांत गटूवार.#seeds

बोगस बियाणे पासून सावध असावे.

श्री प्रशांत गटूवार, माजी तालुका शिवसेना प्रमुख, मुल.


मूल (प्रकाश चलाख)

मूल तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी बांधव खरीप हंगामात व्यस्त आहे. पळे टाकने योग्य पाऊस झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पळे टाकण्यास प्रारंभ झाला आहे. शेतकरी बांधवांनी पळे टाकताना कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या बोगस बियाणांपासून सावध असावे अशी विनंती माजी शिवसेना प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य चिचाळा श्री. प्रशांत गटूवार यांनी केली आहे.



मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव धानाचे उत्पन्न घेत असून उच्च प्रतीचा तांदूळ येथे निर्माण होऊन बाहेर निर्यात केला जात आहे. खरीप, रब्बी हंगामात या परिसरात धान उत्पादक शेतकरी धानाची लागवड करीत असल्याने मूल तालुका सर्वत्र परिचित आहे.

गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी बांधव सुखावला असून खरीपाच्या लगबगीत आहे. आधीच कर्जाच्या खाईत असलेल ला शेतकरी बंधू आपल्या पूर्व तयारीला लागला असून अशातच कृषी कें द्रा मधून प्राप्त होत असलेल्या बोगस बियाण्यांपासून शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान होत असते. त्यामुळे या सत्रात शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन तसेच कृषी विभाग यांनीसुद्धा शेतकरी बांधवांना माहिती देऊन बोगस बियाणांपासून सावध असावे व काही तक्रारी उद्भ भवल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मूल तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कृषी कें द्रा मार्फत बियाणे, खते यांचे दरवर्षी वाटप केल्या जाते. परंतु यावेळेस कोरो ना संकट देशात उभे असल्याने सोशल डिस्टंसिंग बाळगून कोणतेही व्यवहार करण्याची विनंती शासनातर्फे करण्यात आली आहे.

त्यामुळे यावेळेस शेतकरी बांधवांना कृषि निविष्ठा कृषी केंद्रातून खरेदी न करता "शेतीच्या बांधावरच" योजनेअंतर्गत खरेदी करायची आहे. शेतकरी बियाणे खरेदी करीत असताना खबरदारी घेऊन व त्याची शहानिशा करून आपल्या शेतात त्याचा वापर करणे गरजेचे आहे. असे करीत असतांना शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेऊन ही सर्व प्रक्रिया करायची आहे. व भविष्यातील आपली नुकसान टाळायची आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांचा तालुक्यात शिरका व होऊन याला नाहक शेतकरी बांधव बळी पडत होते. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन कोणतेही बियाणे खरेदी पूर्वी तपासून घ्यावे व काही तक्रारी उद्भवल्यास त्वरित संपर्क साधावा अशी विनंती माजी शिवसेना प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य चिचळा श्री. प्रशांत गटूवार यांनी शेतकरी बांधवांना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!