कन्हाळगांव येथील खचलेल्या पुलाने अपघाताचा धोका

कन्हाळगांव येथील खचलेल्या पूलाने अपघाताचा धोका


जितेंद्र पेंदाम( सिंदेवाही प्रतीनिधी)

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा कन्हाळगांव येथील पूल अर्धवट खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असुन दुरूस्त करण्याची मागनी नागरीकांनी केली आहे.
कन्हाळगांव हे गाव सिंदेवाही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. येथील पूलाचे अनेक वर्षा पासून करण्यात आले होते . ते काम आता जिर्ण झालेले दिसत आहे. त्या पूलाचे बांधकाम करायला पाहीजे होते. परंतु अद्यापही त्या पूलाचे बांधकाम करण्यात आले नाही.
यावर्षी तर तो पूल अर्धवट खचलेला आहे. अर्धवट खचलेला पूलाचा रस्ता हा कन्हाळगांव येथील नागरीकासाठी मुख्य रस्ता आहे. त्याच रस्त्यावरून नागरीकांना ये जा करावं लागते.
खचलेल्या पूलावरून वाहने चालवने व ये जा करने भितीचे झाले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
  पावसापुर्वीच त्या पूलाची  अवस्था अर्धवट खचलेला आहे. तर पावसाळ्यात तो पूल पुर्ण खचला तर कन्हाळगांव वासीयांसाठी धोका निर्माण होवू शकतो .
  परीणाम नागरीकासांठी डोके दु;खी ठरू शकते. कन्हाळगांव येथील नागरीकांना कोनतेही कामाकरीता सिंदेवाहीला यावे लागते. हाच मुख्य रस्ता असल्याने पावसात त्या पूलावरून प्रवास करने धोक्याचे झाले आहे.
  पूलाच्या बाजुला मोठा खड्डा पडलेला आहे. तिथे जर पाळीव प्राणी बैल ,गायी , म्हैस व शेळ्या गेले तर त्यांच्याही जिवाचा धोका निर्माण झाला आहे.
   त्या पूलाची डागडुजी किंवा पूलाचे बांधकाम करण्यात आले नाही तर  भविष्यात संभाव्य  धोका  सांगता येत नसल्याचे येथील नागरीकाकडुन सांगन्यात येत आहे.
   संभाव्य धोका टाळन्याकरीता या पूलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!