नगर परिषद कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करा



नागभीड (यश कायरकर)

नगर परिषद नागभीडला महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.विश्वनाथजी घुगे साहेब यांनी भेट दिली असता सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात संपूर्ण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे विमा कवच लागू करणे,नवनिर्मित नगरपरिषदेतील समावेश झालेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे,नगरपरिषद कर्मचारी वर्गाचे एनपीएस खाते काढण्याबाबत, सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिले वेळेत मिळण्याबाबत,नागरपरिषदेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या..!!
त्यांनी या निवेदनाचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देतांना चंद्रपुर जिल्हा सचिव श्री.मोरेश्वर येरणे व संवर्गातील कर्मचारी श्री.लक्ष्मणजी लोंढे,श्री.नकुल भाजीपाले,श्री.अभिषेक शिंदे,श्री.शंशांक डांगे तसेच नगर परिषद शाखा नागभीडचे अध्यक्ष श्री.परसराम वंजारी तसेच पदाधिकारी श्री.विनायक चौधरी, श्री.गुलाब ठाकरे,श्री.निलकंठ कावळे,श्री.गजानन समर्थ,सौ.नंदा गोडे,श्री.सचिन गळमळे,श्री.तुळशिदास कुत्तरमारे,रितेश येरणे,रवींद्र कुर्झेकर,श्री.पंढरी गायकवाड,श्री.प्रेमदास धोंगडे,सौ.दुर्गा रगडे इत्यादी कर्मचारी उपस्थीत होते...!!

▪कोरोना महामारीच्या काळात नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून काम करीत आहेत अश्यावेळी शासनाने या आमच्या मागण्यांची योग्य दखल घेत लवकरच मागण्या मंजूर कराव्या..!! -मोरेश्वर येरणे नगर परिषद कर्मचारी
पब्लिक पंचनामा चे व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!