पालकमंत्र्यांच्या क्षेत्रातील दोन गावे अंधारात
पालकमंत्र्याच्या क्षेत्रातील दोन गावे अंधारात
सावली (विशाल नर्मलवार)
सावली तालुक्यातील मानकापूर व चक-मानकापूर गांवे शंभर टक्के आदीवासी बहुल असून जंगलात असलेली गावे आहेत. दिनांक ११ जून ला रात्री साडेआठ वाजता विजगर्जने सोबत पावसाला सुरुवात झाल्याने या दोन्ही गावांतील वीज पुरवठा खंडित झाला. ही गावे पावसाळ्याला सुरुवात झाल्याने गावात हिंस्त्र व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वावर असल्याने गावकऱ्यांना दहशतीचे जीवन जगावे लागत आहे. परंतु दोन दिवस उलटूनही संबंधित विभागाने याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे गावकरी अजूनही अंधारात जगत आहेत. सदर माहिती आज गावकऱ्यांनी लाईनमॅन ला दिली असता, आता अंधार पडला आहे, मी आता येणार नाही. मी उद्या येऊन पाहतो. अशी उडवाउडवीची उत्तरे लाईनमॅन ने गावकऱ्यांना दिली.
मागील वर्षी पासून हीच समस्या असल्याने महावितरणकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!