मूल तालुक्यात रेती तस्करी जोरात
मूल (प्रतिनिधी)
केळझर, मंदातुकूम परिसरातुन अवैध रेती वाहतुक
दिवसरात्रौ रेतीची चोरी: तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
मूल: तालुक्यात मोठया प्रमाणावर खाजगी आणि सरकारी कामे सुरू आहेत, प्रत्येकांना रेतीची गरज आहे, त्यामुळे येथील रेती तस्कर मोठया प्रमाणावर रेतीची वाहतुक करून जास्त दराने विक्री करीत आहे, तालुक्यातील केळझर, मंदातुकूम येथील रेतीसाठा तालुका प्रशासनाने जप्त करून काही दिवसांपुर्वी त्यासाठाचा लिलावही झाला, मात्र रेती तस्कर याचाच फायदा घेवून नदीतुन रेती काढुन रात्रौ दिवस हायवाने रेतीची वाहतुक करीत आहे, याकडे तालुका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने प्रशासनाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.
मूल तालुक्यातील मौजा चिरोली केळझर परिसरात मोठया प्रमाणावर रेती तस्करांची फौज आहे, दिवस रात्रौ यापरिसरातुन रेतीची वाहतुक केली जाते, तहसीलदार त्यापरिसरात गेलेच तर रेती तस्करांचे खबरी त्यांना माहिती देवून रेती तस्करी बंद करण्यास सांगतात, याखबरीमध्ये काही कर्मचाÚयांचाही समावेश आहे, दरम्यान तहसीलदार जाधव यांनी काही दिवसापुर्वी मौजा केळझर, सारजखेडा आणि मंदातुकूम यासह तालुक्यातील रेतीसाठा जप्त केले.
मागील 7 महिण्यापासुन प्रशासनाने रेती घाटाचा लिलाव केलेला नाही, मात्र तालुक्यात मोठया प्रमाणावर खाजगी आणि सरकारी कामे सुरू आहेत, त्याचा फायदा घेत येथील रेती तस्कर जास्त दराने रस्त्या रस्त्यावर दलाल नेमुन रेतीची वाहतुक करीत आहे, रेतीची वाहतुक करतांना त्रास होवू नये यासाठी चिरोली आणि केळझर येथील रेती तस्कर रेती साठा तयार करून ठेवला होता, तहसीलदार यांना माहिती होताच त्यांनी केळझर येथील 20 ब्रास, सारजखेडा येथील 11 ब्रास आणि मंदातुकूम येथील 65 ब्रास रेती साठा जप्त केलेला आहे. त्या रेतीसाठा लिलाव झालेला आहे, त्याचा फायदा घेत रेती तस्करांनी नदीमधुन अवैध रेती वाहतुक करीत आहे, सदर रेती तस्करांनी दिवस रात्रौ हायवाने रेतीची वाहतुक करीत आहे, मात्र तालुका प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!