चंद्रपूर येथे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह मिळाला रुग्ण

 
चंद्रपूर जिल्हातील कोरोना बाधीतांची संख्या पोहचली २७ वर

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर महानगरातील भिवापुर वार्ड परिसरातील एक ६२ वर्षीय व्यक्ती शुक्रवार दिनांक. ५ जून २०२० रोजी कोरोना बाधित आढळले.जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रुग्ण म्हणून अती दक्षता कक्षात दाखल बाधीताच्या स्वॅबचा अहवाल आज ५ जून रोजी पॉझिटीव्ह आला. त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप व खोकला होता. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते काल ४ जून रोजी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव आला. यामुळे चंद्रपूर मध्ये आतापर्यत २ मे ला ( एक बाधीत ), १३ मे ला ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २७ झाली आहे.आतापर्यंत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ५ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!