पब्लिक पंचनामा च्या त्या वृत्ताची आम. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल.
पब्लिक पंचनामा च्या त्या वृत्ताची आम. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल.
मूल (प्रतिनिधी)
पब्लिक पंचनामा चे मूल प्रतिनिधी अमित राऊत यांनी "विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट स्वप्नवतच राहणार काय?"
या मथळ्याखाली, प्रकाशित पब्लिक पंचनामा च्या वृत्ताची दखल राज्याचे माजी मंत्री तथा पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत कार्यकारी अभियंता यांना काम तातडीने करावे असे निर्देश दिलेले आहेत.
मूल आठवडी बाजार चे काम संथ गतीने सुरू आहे. ठिक-ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत. बांधकाम साहित्य टाकले आहे. यामुळे आणि येत्या काही दिवसात पाऊस सुरू होणार असल्याने भाजी विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना अडचणी निर्माण होईल अशा आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल माजी अर्थमंत्री तसेच विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. त्यांनी कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग क्रमांक २ यांना लेखी पत्र पाठवून आठवडी बाजाराचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश दिले या पत्राची प्रत त्यांनी, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग मूल तसेच चे पत्रकार अमित राऊत यांना पाठविले आहे. आमदार मुंगटीवार यांनी या वृत्ताची दखल घेतल्याने आठवडी बाजाराचे कामाला गती येईल अशी आशा निर्माण झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!