कासरगाव येथील घटना, सात महिन्याची गर्भवती होती मृतक महिला

कासरगाव येथील घटना, सात महिन्याची गर्भवती होती मृतक महिला



सावली (प्रतिनिधी)

सावली तालुक्यातील आणि पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कासरगाव येथील एका सात महिने गर्भवती असलेल्या महिलेची हत्या केल्याचा सणसणीत आरोप जीबगाव येथील तिच्या आईवडिलांनी प्रत्यक्षरित्या केलेला आहे. लोभीका महेश भोयर 23 वर्ष रा.कसरगाव असे मृतक महिलेचे नाव आहे, सविस्तर असे की मृतक लोभीका रा.जीबगाव हिचा विवाह तीन वर्षांपुर्वी महेश भेयर रा.कासरगाव याच्याशी झाला होता. सांसरीक परिवार योग्य रीतीने चालू असतानां कुठे माशी शिंकली कुणाचं ठाऊक पतिकडील कुटुंबात वादंग निर्माण झाले आणि सात महिने गर्भवती असलेल्या लोभीकाला आपला जीव गमवावा लागला एवढी मोठी घटना मृतक महिलेच्या कुटुंबात घडली असतांना याची साधी कल्पना जावईबुवांकडून जीबगाव येथिल सासरच्या कुटुंबियांना कळू दिले नाही. सदर ची घटना जीबगाव येथिलच कसरगावात दिलेल्या पत्नीकडून कळते. या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती होताच जीबगाव येतील आई वडील कासरगाव येथे मुलीच्या शोधात नदीकडे जातात आणि जावईबुवांकडून पत्नीचे शव मिळाल्याची माहिती मिळते. मग तिचा दफनविधी केला जातो मग मुलीने आत्महत्या केली असेल तर तीची तक्रार ठाण्यात का दिली नाही? आणि तिच्या मृतदेहाचा परस्पर विल्हेवाट का लावण्यात आला? या बाबत जीबगाव येथील आईवडील काका, मुलगी यांच्याकडून शंका व्यक्त केली जात आहे, आम्हाला मुलीच्या शोधासाठी नदीकडे पाठवून आमच्या मागे मृतदेह कसा सापडतो? याबाबत अनेक तर्कवितर्क आईवडीलांकडुन लावले जात आहे,
त्यामुळे आमच्या मुलीचि आत्महत्या नसुन जावई आणि त्यांच्या कुटुंबाकडून केलेली हत्याच आहे असा संसनिक आरोप आईवडीलांकडून प्रत्यक्ष केला जात असून जावई आणि त्याच्या कुटुंबावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी मृत महिलेच्या आईवडीलांकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!