सागवान चोरीच्या आरोपींना मुद्देमालासह चिमूर पोलिसांनी केली अटक
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि. ०३/०६/२०२० रोजी फिर्यादी नत्थु बालाजी तळवेकर. राहणार चिमूर यांचे तक्रारीवरून पो.स्टे. चिमूर हद्दीत येत असलेल्या मौजा काग (बामणी) येथील शेत शिवारातून सागवान लाकुड एकूण ७५,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या फिर्यादी वरून अप. क्र. १९७/२० कलम ३७९,३४ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील माल व आरोपी यांचा शोध घेतला असता ०४ आरोपी सर्व राहणार मौजा काग (बामणी) तह. चिमूर यांचा अथक परिश्रम घेऊन २४ तासाचे आत मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेतले असून सदरची कारवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे चिमूर यांचे अधिपत्याखाली सपोनि रवींद्र खैरकर, पो.उप.नि. राजू गायकवाड, पो.ह.वा. डोनू मोहूर्ले, नापोशी दिनेश सूर्यवंशी , किशोर बोढे , पोशी विशाल वाढई, रवी आठवले , देविदास रणदिवे यांनी पार पाडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!