जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन
सचिन वाकडे, मुल
पर्यावरण हि काळाची गरज असून त्याचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेण्यासाठी दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येते.
जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करता येऊ शकते. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्या क्लोरे - फ्लुरो कार्बन वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक असून पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे, नद्याचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु यात शंका नाही.
पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया, प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरु या, इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया, पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया. कारण आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.
संदेश
वाढत्या प्रदुषणानानं सारं जग त्रस्त झालं आहे. म्हणून पर्यावरण संवर्धन ही साऱ्या सजीवाची किंबहुना काळाची गरज झाली आहे. जागतिक पर्यावरण दिवशी सर्वांनी एक तरी रोपटे लावून त्याला प्रेमाने खतपाणी घालून हा दिवस साजरा करायचा असतो. शाळा, काँलेजमधून व्रुक्षदिंडींनी जणजाग्रुती करुन, व्रुक्षावरच आपलं जीवन अवलंबून आहे असे पटवून व्याख्यान देऊन हा दिवस साजरा करावा. वड हे भरपूर प्रमाणात शुद्ध प्राणवायू देणारं वृक्ष आहे. यंदा वटपोर्णिमा व जागतिक पर्यावरण दिन एकाच दिवशी आल्याने महिलांनी पूजेसोबतच वडाच्या झाडाचे रोपन करावे जेणेकरुन ह्या झाडांची संख्या वाढून वातावरण शुद्ध होण्यास मदत होईल. झाडामुळे वातावरण थंड राहतं, जमिनीची धूप थांबते, पावसाचं पाणी शोषण करुन ओलावा कायम ठेवतो, तसेच फळ, फुल, औषधी देऊन मानवाच्या सतत सेवेतच असतं. अशा झाडाच्या निस्वार्थी वृत्तीला माझा कोटी कोटी सलाम. प्रत्येक सजीव हा दिर्घआयुष्य जगला पाहिजे. वृक्ष जगवण्याची कळकळ प्रत्येक मनामनात वसली तरचं हे शक्य होईल. कारण झाडावरच आपलं आयुष्य अवलंबून आहे. वृक्ष आहेत म्हणून आपण आहोत, ही भावना प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यावी. अधिकाधिक झाडाचे रोपन केल्याने जागतिक पर्यावरण दिनाला मानाचा सलाम ठरेल. सर्वाना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा...! सौ. वर्षा भांडारकर, मुल पर्यावरणप्रेमी





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!