विद्युत पुरवठा वारंवार खंडित होऊ नये म्हणून महावितरण उप कार्यकारी अभियंता यांना जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी केले निवेदन सादर



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दि.०४ जून २०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सर्व जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो याची दखल जिल्हा कांग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा जी.प. सदस्य गजानन बुटके यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील सहाय्यक अभियंता गायकवाड मॅडम यांना निवेदन दिले .चिमूर तालुक्यातील विद्युत व्यवस्था योग्य नसल्याने वारंवार विद्युत खंडित होत आहे. दिवसागणिक बारा तासात चोवीस वेळा विदुयत खंडित होते.यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या परिस्थितीत विद्युत पुरवठा अत्यंत आवश्यक झाल्याने तालुक्यातील नागरिक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी शासकीय कार्यालये दवाखाने व व्यापारी यांचेवर प्रचंड परिणाम होत आहे जनता त्रस्त झालेली आहे. त्यासोबत अन्य मागण्या असून चिमूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांना ३०० युनिट मोफत देण्यात यावे व विद्युत खंडित होत असल्यास विद्युत विभागाकडून विद्युत खंडित होण्याअगोदर सोशल मीडियावर संबंधित बाबीची माहिती प्रसारित करण्यात यावी ,विद्युत ग्राहकाचे कनेक्शन ग्राहकाचे विना परवानगी ने कापण्यात येऊ नये, शेतकऱ्यांचे शेतात कृषी पंपाची वीज जोडणी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे,शेतकऱ्यांचे शेतात कृषी पंपाची वीज जोडणी मागेल त्यास देण्यात यावे या मागण्या आहेत 
     निवेदन देण्यात आल्यावर भ्रमणध्वनी वरून उपकार्यकारी अभियंता जळगावकर यांनी जी. प. सदस्य गजानन बुटके यांचे शी तात्काळ संपर्क करून त्यांनी कोणतीही आंदोलन करू नये व येत्या तीन दिवसात विदुयत पुरवठा खंडित होणार नाही आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे लेखी पत्र त्यांनी सहाय्यक अभियंता गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून दिले आहे. 
       निवेदन देत असताना सुनील दाभेकर ,प्रमोद दांडेकर , सचिन पचारे  , माजी सरपंच संजय  चौधरी , स्वप्नील लांडगे , अमोल गोडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!