चालत्या गाडीने पेट घेतला#blost

चालत्या गाडीने पेट घेतला

ड्रायवरच्या प्रसंगवधानाने अनर्थ टळला

सिंदेवाही पळसगाव मार्गावर मेंढा गावाजवळ घटना



जितेंद्र पेंदाम( सिंदेवाही प्रतीनिधी):-
सिंदेवाही वरून पळसगावाकडे जाणा-या एका वाहनाला मेंढा गावाजवळ अचानक पेट घेतल्याने अपघात झाला असुन ड्रायवरच्या प्रसंगवधानाने अनर्थ टळला.
मिळालेल्या माहीती नुसार पळसगाव येथील गाडी कुळमेथे नावाच्या ड्रायवरनं सिंदेवाही वरून पळसगाव जाट कडे जात होता.
गाडी मेंढा गावाजवळ पोहोचताच गाडीमधुन अचानक धुवा निघाल्याने कुडमेथेने गाडी थांबवली.
त्याच रस्त्याने धनंजय बन्सोड, गनेश पेंदाम ,जितेंद्र नागदेवते जात होते. कुडमेथेने त्यांना बोलावलं. गाडी धुवा मारत असल्याचे सांगत गाडीने पेट घेतला. गाडी पाहता पाहता जळली.
गाडीमध्ये फक्त कुडमेथे हा एकटाच होता.
प्रसंगवधानाने अनर्थ टळला . ही घटना आज चार वाजताच्या सुमारास घडली.
सदर घटना धनंजय बन्सोड सर ,गनेश पेंदाम, जितेंद्र नागदेवते यांच्या समक्ष घडल्याचे सांगीतल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!