चिमूर (प्रतिनिधी)
चिमूर तालुक्यातील पुन्हा वाघाच्या हल्यात कोलारा येथील राजू दडमल वय 47 हाइसम ठार एका आठवड्यात दुसरा तर तीन महिन्यात पाच बळी
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध असलेला चिमूर वरून अगदी १२ कि.मी. अंतरावर कोलारा गेट आहे.त्यात ताडोबा कोअर व बफर असे २ झोन पाडण्यात आले असून अगदी बफर व कोअर झोन लगत असलेल्या कोलारा शेत शिवारातील जंगलाशेजारी बकऱ्यांना चारा आणण्यासाठी शेतकरी गावा शेजारील शेत शिवारात गेला ५ जून २०२० या तारखेला गेले असता २ दिवसांपासून बेपत्ता होते.त्यांची शोध मोहीम सुरू असतांना
दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी राजेश्वर लक्षण दडमल वय ५४ वर्षे रा.कोलारा यांना जागीच ठार केले.सदर घटना हि सकाळी ०७:३० वाजता उघडकिस आली. काहींनी वाघाला त्या ठिकाणी बघितले असता या पूर्वी याच परिसरातील ही पाचवी घटना आहे,गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्य प्राणी या भागात नेहमीच वावर करीत असतात. या पूर्वी कोलारा येथील शेतकरी पुरुष व महिलेला, तसेच सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले होते. त्यामुळे कोलारा गावाजवळील परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे. या घटनास्थळी शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास वनविभागामार्फत सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!