अपघातास आमत्रंण देनार्या त्या वृक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अपघातास आमत्रंण देनार्या त्या वृक्षाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष
सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)
सिन्देवाही ते चिमूर या मुख्य मार्गावर शिवाजी चौक जवळ, बस स्थानका पासून अवघ्या 100 मिटर अंतरावर एक काटेरी वृक्ष भर रस्त्यावर वाकलेल्या स्थितित असून केव्हांही मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या मार्गावरून रोज शेकडो वाहने ये-जा करित असतात. त्यात स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी असतांनाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. रात्रौच्या वेळेस तो वृक्ष दिसून येत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि असे झाल्यास जबाबदार कोन? असे प्रश्न निर्माण होत असून स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर आलेल्या या झाडाच्या फांद्या तोडाव्या अशी मागणी केली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!