विजेच्या लपंडावाने नागरीक त्रस्त

विजेच्या लपंडावाने नागरीक त्रस्त

विद्युत केव्हा जाईल याचा नेम नाही.

नेटवर्करची कामे रखडत आहेत

विद्युत सुरळीत करण्याची मागनी


जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही प्रतीनिधी):-

पवनपार परीसरातील नागरीक सततच्या विजेच्या लपंडावाने त्रस्त असुन परीसरातील विद्युत केव्हा जाईल याचा नेम उरलेला नाही.
दरम्यान परीसरातील विद्युत सेवा सुरळीत व नियमित करण्यात यावी अशी मागनी नागरीकांनी केली आहे.
आता पावसाचे दिवस आले असुन शेतकर्यांचे आनलाईन चे कामे आहेत. दिवसेंदिवस आनलाईनचेच कामे वाढत असुन विद्युत आवश्यक आहे. विद्युत नसेल तर आनलाईन चे कामे होवुच शकत नाही. त्यामुळे नेटवर्कवर चालनारे काम रखडत अाहेत. विद्युत केव्हा जाईल याचा नेम नाही त्यामुळे नेटवर्कची कामे करतांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र ग्रामिण भागात निर्माण झाले आहे.
आता ग्रामिण भागातील नागरीकांना विजेची सवय झाल्याने विद्युत आवश्यक झाले आहे. विद्युत वर चालनारे उपकरने ही ग्रामिण भागात आल्याने विजेअभावी उपकरने चालु शकत नाही.
परंतु विजेच्या लपंडावाने नागरीक त्रस्त झाले असुन विद्युत सुरळीत करण्यात यावा अशी मागनी परीसरातील नागरीकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!