गोरगरिबांना अन्नधान्यासह माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप.
जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून हळदी (तु) येथे गोरगरिबांना अन्नधान्यासह माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप.
मूल (प्रकाश चलाख)
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून मूल तालुक्यातील हळदी (तु) येथे दिनांक 2 मे 2020 रोजी गोरगरिबांना अन्नधान्यासह माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून आता जिल्हातही कोरोणा संक्रमितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अशा निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याची मदत व्हावी या भावनेतून आणि अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन सॅनिटयझर व मॉस्कचा उपयोग करावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मुल तालुक्यातील हळदी (तु) येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी गरजू आणि निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याच्या कीटचे आणि स्थानिकांना माॅस्क व सॅनिटयझरचे वाटप केले.
यावेळी भाजपाचे चीचाला येथील कार्यकर्ते अमोल येलंकिवार, हळदी येथील सरपंचा सौ. कमल बुरांडे, जिवनदास चलाख, सखारामजी चलाख यांसह आदि मंडळी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!