पळसगावात नाली सफाई सुरू



ग्राम पंचायत चा पुढाकार


पावसाळ्यापूर्वीची घेतली खबरदारी


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगांव (पि): - चिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या पळसगांव ग्राम पंचायत च्या वतीने गावातील अंतर्गत छोट्या नाल्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे.सरपंच सचिव यांच्या पुढाकाराने गावातील नालीतील गाळ उपसला केल्या जात आहे.पावसाळ्यात पाऊसाचे  सांडपाणी व वाहते पाणी कुठेही अडणार नाही,याची खबरदारी ग्राम पंचायत घेत आहे.गावातील सर्व वॉर्डातील नालीतील गाळ काढन्याचे काम ४५ मजुरां मार्फत केल्या जात आहे.गाळाचा उपसा करून गाळ गावा बाहेर टाकल्या जात आहे,या कामी ग्राम पंचायत सदस्यासह ग्राम पंचायत कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!