खाकी वर्दीतील माणूस
खाकी वर्दीतील माणूस
रमेश बलैया वनपरिमंडळ अधिकारी
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमूर तालुका हा क्रांती भुमी तालुका म्हणून ओळखला जातो या ठिकाणावरून ताडोबा व्याघ्र प्रकल्प जवळुन आहे, मात्र जंगलाचे संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आज माणसाने माणुसकीचा काड घातल्यानचे पाहायला मिळाले मिडत आहे..
वनपरिक्षेत्र चिमूर अंतर्गत उपक्षेत्र खडसंगी येत असून येथे काही वर्षापूर्वी रुजू झालेले वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया हे आपली खाकी वर्दी ड्युटी करत जंगलाचे संरक्षण करायला आले, वनविभागाची निर्मीती ही पर्यावरण समतोल राखण्यासाठी, वनांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची निर्मिती झाली त्यासाठी सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयाच्यानिधी सुद्धा येत असतो अशातच खडसंगी वनउपक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन,सागवान वृक्षतोड व हात भट्टी द्वारे दारू करण्याचा मुसक्या आवळण्याचे काम बलैया वन परिमंडळ अधिकारी यांनी आपल्या कमी दिवसाचा करायला सुरुवात केली व ते दबंग या नावाने तालुक्यात प्रसिद्ध झाले त्यांनी अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्ती करून हातभट्टी दारू काढणारे यांच्यावर कारवाई करत जंगलाचे संरक्षण व वन्यजीवांची शिकारी
थांबवणे वन्यजीवांचे संवर्धनासाठी उपाययोजना करायला लागले त्यातच अवैध सागवण वृक्षतोड प्रकरण त्यांनी मागील काही महिन्यांमध्ये वनखात्यातील उजेडात आणले व आपल्या क्षेत्रात कार्य करतांना त्यांनी अवैध रेती वाहतूक,अवैध वृक्षतोड यावर निर्बंध आणून त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले असतांना त्यात गुंतलेले अनेक लहान-मोठे मासे जाळ्यात सापडणाऱ्या या भीतीपोटी त्यांची कमी दिवसातच बदली करण्यात आली आहे..
"गुन्हेगाराला सोडून संन्याशाला फाशी असेच म्हणावे लागेल; त्यांनी वनांचे संरक्षण करत अवैध सागवान पकडले पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वनांचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग यासाठी प्रयत्न करत असतात तसेच या करता ग्रामीण भागात वनसमित्या स्थापन करण्यात आले आहे सरकार कडुन वणांचे संरक्षण आणि संवर्धन करीता भरपूर प्रमाणात निधी दिला जातो.
भीसी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या लाखो रुपयाचे सागवान जप्त करून कारवाई केली हे करत असताना त्यात कोणतीही अनेक मासे वनरक्षक, वनपाल सहित शिक्षा होणार या भीतीने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांनी आपल्या कमी कार्यातच चिमूर तालुक्यात दबंग नावाची ओळख निर्माण केली होती दबंग नावाने ते चिमूर तालुक्यात भिसी,शंकरपुर,जांभुळघाट,
खडसंगी ,नेरी क्षेत्रात प्रचलित झाले असल्याने अवैध वृक्षतोडीला आळा बसला होता आज त्यांच्या बदलीमुळे रेती तस्कर, वृक्षतोड तस्कर मोकळे श्वास घेत आहे इकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष संवर्धनासाठी संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च करत असतात मात्र खऱ्या जो अर्थाने संरक्षण करतो त्यांची कदर होत नाही हे सिद्ध झाले.



We proud of officers which are presenting himself towards national security services.
उत्तर द्याहटवा