चिमुर वनविभागा चे भोंगाळ कारभार चोरांना सोडून सन्यासाला फासी ?



तालूका - प्रतिनिधी  ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालूक्यात वनविभागत भोंगळ कारभार दिसुन येत आहे.लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध सांगवान वृक्ष तोड करण्यात आली.भिसी उप वनपरीक्षेत्रात लाखोचा सांगवान वृक्ष अवैध पणे तोडण्यात आले होते. खडसंगी व भिसी वनक्षेत्रात दिवस-रात्रो अवैध पणे रेत्ती तस्करी होत होती.या तस्करीला आळा घालण्याचे काम रमेश बलैया वनपरिमंडळ अधिकारी यांनी केला.या अधिकाऱ्याला तात्काल बदली करण्यात आली.व कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.म्हणजेच चोराना सोडून संण्यासाला फासी देण्यात अाली असे चिमुर वन परीक्षेत्रात अनुभवयाला मिळत आहे.भिसी उप वनक्षेत्रात बऱ्याच वर्षापासुन अवैद्य पणे सांगवान वृक्ष तोडण्या काम ठेकेदार करीत होते.त्याला पुर्ण सहकार्य वनपाल वाय.के.दोडके व वनरक्षक करीत होते.यांच्या वर कारवाई व्हायला पाहीजे होती पण त्यांच्या वर न होता रमेश बलैया वनपरिमंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.काळे धंदे किती अावश्यक आहे हे सिध्द झाले. झाडे लावा-झाडे जगवा या वाक्य ला अाता बदलून झाडे तोडा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो.असे वनविभागा मध्ये अधिकारी व कर्मचारी काम सुरू आहे.भिसी उप वनक्षेत्रात कर्मचारी हे आपला हिस्सा (टक्केवारी) घेतल्या शिवाय काम करीत नसतात.सामान्य जनतेला योजनेचा लाभ देताना त्याच्या कडून बोलणी केली जाते त्या रक्कमेतु आम्हाला इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल.सामोरच्या लार्भात्याना कबुल केली तर केस लवकरात लवकर सामोर जात असते व लवकरात-लवकर लाभ मिळत असते.जर लार्भात्यानी कबूल केले नाही तर ती केस दहा चक्ररा मारून शुध्दा केस मान्य होत नाही.वनविभाग म्हणतो की आम्ही तात्काल नुसकान भरपाई लार्भात्याना देत असतो.पण असे होत नाही.सामान्य लार्भाथीला कुटे ना कुटे केस मध्ये खोट दाखवीत असतात.अश्या सामान्य लाभार्थी चे म्हणने सार्वजनिक ठिकाणी होत असते.जे कर्मचारी व अधिकारी चांगले काम करीत असतात त्यांच्यावर कारवाई होत असते. तर तस्कराला सहकार्य करीत असतो त्यांना शाब्बस्की मिळत असते.अशेस चिमुर वनपरीक्षेत्रात घडल्याचे दिसुन येत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!