अवैध दारू विकताना एकास अटक
अवैध दारू विकताना एकास अटक
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या कवडशी (देश) येथे अवैध रित्या दारू विकताना एकास अटक करण्यात आली आहे ही घटना सोमवारी सांयकाळी घडली आहे रोशन गाडगे हे कवडशी येथे अवैध रित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती शंकरपूर पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी धाड मारून मुद्देमाल जप्त केला त्यात दोन हजार चारशे रुपये किमतीच्या 24 देशी दारू च्या निपा जप्त केल्या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!