चिमुर शहरात लपून छपून येणाऱ्या दारू तस्करावर पोलिसांची धाड
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.२४/०६/२०२० अनेक दिवसापासून चिमूर परिसरात अवैद्य दारू विक्रेते वेगवेगळी शक्कल लडवून स्वतःच्या दुचाकी वाहनाने देशी विदेशी दारू आणून चिमूर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे यावर पोलिसांनी आपली चाणाक्ष बुद्धीचा वापर करून अवैद्य दारू विक्रेता धनंजय बिंगेवार रा. गुरुदेव वार्ड चिमूर याच्यावर पाळत ठेऊन आज दिनांक.२४ जून रोजी त्याने आपली ग्रे रंगाची सुझुकी मोपेड दुचाकी क्र. MH 34 BS 8866 मधील फूटरेसमध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल लपवून पिंपळनेरी मार्गाने येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने चिमूर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात २६ नग विदेशी दारूच्या निपा असा एकूण ७८,९०० रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.
सदरची कारवाही मा. उप विभागीय पोलीस अधिकारी तारे साहेब , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पो.ह.वा. विलास निमगडे, पो.शी. सचिन गजभिये, विनायक सरकुंडे यांनी पार पाडली.
सदरची कारवाही मा. उप विभागीय पोलीस अधिकारी तारे साहेब , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पो.ह.वा. विलास निमगडे, पो.शी. सचिन गजभिये, विनायक सरकुंडे यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!