कारंजाचे टाके साफ करा - आम आदमी पार्टीची मागणी

कारंजाचे टाके साफ करा - आम आदमी पार्टीची मागणी
मूल (गौरव शामकुळे):
मूल शहरात बनविण्यात आलेले कांरजाचे टाके मागील 5 महिण्यापासून बंद अवस्थेत आहेत, त्यातील पाणी साचून असल्याने त्यामध्ये षेवाळ निर्माण झाल्याने पाण्याचा प्रचंड दुर्गंध येत आहे. तसेच जंतू व डासांचा प्रादुर्भाव भयंकर झालेला आहे. यामुळे तेथील परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रष्न निर्माण होत आहे. म्हणूनच त्याची साफ सफाई करणे गरजेचे आहे. याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा शाखेचे जिल्हा अध्यक्ष गौरव शामकुळे,अमित राऊत,  महेश दुधबळे , पियुश रामटेके  यांनी केली. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!