मूल नगरपालिकेचे भोंगळ कारभार, नालीचे बांधकाम अर्धवट, लोकांचा घरात शिरतेय पाणी

मूल नगरपालिकेचे भोंगळ कारभार
नालीचे बांधकाम अर्धवट, लोकांचा घरात शिरतेय पाणी
मूल (मंगला बोरकुटे ) :
मूल येथील वार्ड नं. ४ मध्ये पहिलाच पावसाने पूर आला आहे. येथील सार्वजनिक नालीचे बांधकाम २०१५-१६ पासून सुरू झाले असून ते अद्यापही पूर्ण न झाल्याने नालीचे पाणी घरात शिरत आहे.
याबाबत नगर पालिकेकडे तक्रार करून सुद्धा या कामाची दखल घेतली जात नाही, त्यामुळे या वार्डातील लोकांना या पुराचा सामना करावा लागत आहे.
या नालीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, नाहीतर आम्हाला राहण्यासाठी जागा तरी द्यावे. अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!