उर्जानगरचे ग्रामसेवक सुधाकर नगराळे आणी कर्मचारी मानकर यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी

आज दिनांक 12/06/2020 ला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या वतीने मान जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांना, उर्जानगर चे ग्रामसेवक सुधाकर नगराळे आणी कर्मचारी मानकर यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे तसेच कोविड 19 मुळे उर्जानगर ग्रामपंचायत चे सर्व काम मासिक सभा होत नसल्यामुळे पेंन्डींग आहेत त्यामुळे गोरगरीबांना अळथळे निर्माण होत असल्याचे दिसुन आले. उर्जानगर ग्रामसेवक साहेबांना मासीक सभे संबधीत विचारना केली असता त्यांनी कोविड 19 चे कारण सांगीतले. उप कार्यकारी अधिकारी काळे साहेब यांना विचारना केली असता ते म्हणाले की शोशल डिस्टन पाडुन मिंटीग घ्यायला हरकत नाही. पंरतु उर्जानगर ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मासीक सभा लावलेली नाही. त्यामुळे नाईलाज महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या पदाधिकार्यांना जिल्हाधिकारी खेमनार साहेब यांना पर्सनली जाऊन चर्चा करावी लागली आणी तेव्हा जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा म्हणाले की सोशल डिस्टन पाडुन आणी कोविड 19 चे पालन करून मासिक सभा घेण्यास काही हरकत नाही असे सांगीतले आणी तसे तात्काळ मान. कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावर ग्रामपंचायत कार्यालयांना मासिक सभा घेण्यास निर्देश देण्यात यावे असे पत्र दिले आहे. कोविड 19 च्या परिस्थिति अनेक गरीब जनतेचे महत्वाचे कार्यालयीन कामे थांबले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!