लाखोंचा दारू साठा जप्त चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लाखोंचा दारू साठा जप्त
घुग्घुस :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ही दारू तस्करांसाठी वरदान सिद्ध झाली असून गल्लो- गल्ली फुटाण्या सारखी दारू मिळत असून दारूबंदी ही नागरिकांन करीता डोकेदुखी ठरली आहे.
अधा - मधात दारू तस्करी करणारे छोट्या- छोट्या तस्करावर कारवाई होत असते मात्र मोठे तस्कर मोकाटच असतात.
मात्र शुक्रवार 12 जून रोजी गुप्त सुचनेच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखे तर्फे घुग्घुस- धानोरा आय.वी.आर.सी. एल. टोल नाक्या जवळ सापळा रचून एम.एच 40 बी - जी 3289 या टाटा मोबाईल पिकअप मध्ये यवतमाळ जिल्ह्यातुन येत असलेली 90 एम.एल.च्या 270 (संत्रा) देशी दारू पेटी जप्त करण्यात आली अंदाजे हे 27 लाख रुपयांचा दारू साठा असल्याचे समझते यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक उमरेड निवासी कपिल बेलपूलकर याला ताब्यात घेतले घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये अर्ध्या रात्री पर्यंत कारवाई सुरू होती.
सूत्राच्या आधारे या तस्करांचा महोरक्या उमरेड येथील केतन (गोल्डन लॉकर्स ) असल्याचे बोलले जाते मात्र हा केतन कोण? हा सध्यातरी न सुटलेली कोंडीच आहे.
या तथाकथित केतन तर्फे घुग्घुस- चंद्रपूर येथील तस्करांना सोबत घेऊन घुग्घुस व चंद्रपूर पोलिसांशी सेटिंग करून राजरोसपणे विविध गाड्याच्या माध्यमातून यवतमाळ वणी - बेलोरा येथून घुग्घुस, एम.आय.डी.सी व जिल्ह्याभरात दारू पोहचविले जाते.
दारू भरलेल्या वाहनांना लाल व निळ्या रंगांच्या स्विफ्ट कारने तसेच एस. यु. वी.500 वाहनाने कवर दिल्या जातो.
मागील काही दिवसां पासून घुग्घुस येथील दारू तस्करांच्या टोळी तर्फे पोलीस शिपायांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा नवा ट्रेंड शुरू झाला असून या वाढदिवसाच्या फोटोज मोठ्या दिमाखात सोशल मीडियावर प्रसारीत केल्या जातात.
आणि हेच महत्वाचे कारण असावे की जिल्ह्यातील चेक पोस्टवर या गाड्या बिनादिक्कत ये - जा करीत असतात.
तेथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्यास वर्दीतला चोर शंभर टक्के मिळेल.
याच आठवड्यात 04 जून रोजी 250 पेटी दारू एम.एच.40 बी.जी 8749 महेंद्र पीकअप या वाहनासह शिरपूर पोलिसांनी जप्त करून कारवाई केली.
लाखोंच्या मुद्देमालासह धाडसी कारवाई अपराध शाखेचे API बोबडे यांच्या नेतृत्वाखाली PSI भोयर, ASI भोयर, नितीन यादव,पंडित वराट, नितीन रायपूरे, अमोल डावरे, आदींनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!