गडचांदूर ची महिला भेंडवी येथील शेतात विज पडुन मृत्यू
गडचांदूर ची महिला भेंडवी येथील शेतात विज पडुन मृत्यू
चंद्रपूर :【कोरपना】
गडचांदूर प्रभाग सात येथे राहणारी महीला भेंडवी येथे शेताच्या कामावर गेली असता आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान विज पडुन ठार झाली. सुनंदा सुधाकर बावणे (36) असे तीचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार सुनंदा सुधाकर बावणे ही विधवा असुन पती दोन वर्षा पुर्वी मरण पावले तीला लहान एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावर असल्याने ती आज सकाळी भेंडवी येथील संतोष सलाम यांच्या शेतात शेतकामाला गेली असता अचानक पाऊस सुरू झाला हिच्या सोबत आणखी गडचांदूरच्या नऊ व भेंडवी च्या सात महीला काम करीत होत्या. अचानक पाऊस सूरु झाल्याने शेतमजूर महीला शेतातच असलेल्या गोठ्यात जाण्यासाठी निघाले असता सुनंदा हिच्यावर विज कोसळली व जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच राजुरा चे तहसीलदार यांनी घटनास्थळी येवुन पाहणी करुन पंचनामा केला. सुनंदा यांच्या आकस्मिक निधनाने दोन चिमुकल्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अधिक तपास राजुरा पोलीस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!