अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशी करायला अधिकारी नकारात्मक भूमिका का घेतात? किंवा त्यांची कर्तव्यदक्षता कुठे मारली जाते?
चिमूर तालुक्यातील तो अधिकारी कोण?जो गरम काफी पाजणाऱ्यांच्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करतो
रेती व मुरुम तस्करांना अधिकारी व कर्मचारीच मुजोर व बेडर करतात?
रात्रोच्या वेळेस उत्खननाची खुली सुट
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - कोट्यवधी रुपयांच्या मुरुम व रेती गौण खनिजांचे अवैध उत्खनन मालदारच करतात.मालदार पार्टीला कशाप्रकारे गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन करायचे हे चांगल्या प्रकारे अवगत असल्याचे लपून राहिलेले नाही.अवैध उत्खननाच्या खुल्या चित्राचे सर्वत्र दर्शन होत आहे.अवैध उत्खनन सर्रास सुरू असताना गरम काॅफी पाजणाऱ्या मालदार तस्करांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची प्रकरणे चिंताजनक असून,अवैध उत्खनन करणाऱ्या मालदार व दिलदार तस्करांना सबंधीत अधिकारी व कर्मचारीच, मुजोर व बेडर करीत असल्याचे पुढे आले आहे.
तद्वतच मालदार व दिलदार तस्करांची चौकशी करण्यास सदर विभागाचे अधिकारी व कर्मचारी नकारात्मक भूमिका का घेतात? अवैध रेती व मुरुम उत्खनंना बाबत चौकशी करण्या संबंधाने,"त्यांची,कर्तव्यदक्षता कुठे मारली जाते?हा प्रश्न शासन-प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे वारंवार धिंडवडे काढतो आहे.
मुरुम व रेती चोर एकदाचे मुजोर व बेडर झाले तर ते कोणालाच जुमानत नाही,याचे वास्तव्य तस्करांकडून होणाऱ्या खुन व मारहाण प्रकरणातंर्गत,महाराष्ट्र राज्यातील जनतेंनी व शासन-प्रशासनाने अनुभवले आहे.
मुरुम व रेती तस्कर हे मुजोर व बेडर होण्यास प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याने शासनाने,अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित नव्हे तर सेनेतून बडतर्फ करायला पाहिजे,असा मतप्रवाह अख्या महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आहे.
चिमूर तालुकातंर्गत गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत सुध्दा अशाच प्रकारची गंभीर स्थिती असून,अवैधपणे होणाऱ्या गौण खनिज उत्खननाच्या बाबतीत चिमूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी मुंग गिळून गप्प बसले आहेत.
उदाहरणा दाखल,सरकारी जागेवर अवैधपणे विटा भट्टीचा व्यवसाय करणारा पारडपारचा नितेश शेंडे,"जेव्हा,तहसीलदार यांना जुमानत नाही,"तेव्हा,चिमूर चे तहसीलदार संजय नागटिळक किती कर्तव्यदक्ष आहेत?,याची कल्पना येते.नितेश शेंडे सारखा व्यक्ती तहसीलदार संजय नागटिळक यांच्यावर भारी पडू शकतो?"तर,दिनदाहाडे मुरुम व रेतीचे रात्रभर उत्खनंन करणाऱ्या मालदार व राजकीय वरदहस्त लाभलेला तस्करांवर ते काय कारवाई करणार? अशा प्रकारचा प्रश्न अनेक दिवसांपासून चिमूर तालुक्यातील जनतेला भेडसावतो आहे.
चिमूर तालुक्यातील एका अधिकाऱ्यांच्या बाबतीत,अवैध गौणखनिज उत्खनना बाबत जनमानसात खमंग चर्चा असून,सदर अधिकाऱ्यांचाच अवैध उत्खननात सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.अवैध उत्खनंनात एका अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने,गौण खनिज तस्करांचे कोण बरे वाकडे करणार? हा मुद्दा प्रशाकीय अधिकाऱ्यांना आव्हानात्मक आहेच.
सदर अधिकारी किती मालदार झाला,याची एल.सि.बी.टिम द्वारे नियोजनबद्ध पद्धतीने चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.परत दुसरा अधिकारी अवैध व्यवसायातंर्गत माल सुताव अभियानात गर्क आहेच!
अधिकारीच नियम धाब्यावर बसवून बेताल कृती करीत असतील,"तर,जनतेवर सातत्याने अन्याय होणारच!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!