सावरी बिडकर येथे देशी विदेशी मोहफुल दारू विक्रीचा महापूर



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्हा दारू बंदी झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र दारू बंदी असतांनाही दारूचा महापूर वाहत आहे.जिल्ह्यांच्या सिमेवर पोलीस चौक्या मोठ्या प्रमाणात असतांना व वाईन शॉप , बियर बार , देशी दारू भट्टी यांना दैनंदिन दारू विक्री च्या अटी शर्ती  असतात आणि या अटी शर्ती ला दुजोरा देऊन मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू विक्री केली जात आहे. हि दारू दारू बंदी जिल्ह्यात पोलिसांना हप्ते बांधून अवैध दारू विक्रेत्यांकडे ट्रकने व महागड्या कारणे दारू पार्सल केली जात आहे. याची माहिती उत्पादन शुल्क विभाग यांना असून सुद्धा कारवाही होत नाही.जे हप्ते देत नाहीत त्यांच्यावरच कारवाही केली जाते.व दारू कुठून घेतली हा जाब न विचारता दारू विक्रेत्यांवर कारवाही केली जाते.यामुळे पोलिसांना व उत्पादन शुल्क विभाग यांना हप्ते देणारे दारू विक्रेते हे दुकान लावून मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत आहे. याकडे दुर्लक्ष होत असून सामान्य जनता तोंडी तक्रारी करून थकलेले आहे.जर असेच सुरू राहिले तर एक दिवस असा येईल कि बघावे त्या ठिकाणी मुजोरी व प्रत्येक ठिकाणी तळीराम दिसून येतील.वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष दयावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!