नवतळा ग्रा.पं.प्रशासनाने एक वर्षाचे पाणी पट्टी व घर पट्टी तसेच दिवाबत्ती कर माफ करावे - शुभम पारखी युवक काँग्रेस कार्यकर्ता
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - कोरोनाच्या पार्श्रभूमीवर सगळे जनजिवन विस्कळीत झाले असून रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत सामान्यांना कोणताही शासकीय कर अथवा घराचे कर मागू नये त्यामुळे नवतळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी नागरिकांची खालावली स्थित लक्षात घेऊन गावातील एक वर्षाचा पाणी पट्टी कर व घर पट्टी कर , दिवा बती कर रद्द करण्यात यावा यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व सोशल मीडिया प्रमुख शुभम पारखी यांनी ग्रामसेवक ग्राम पंचायत नवतळा यांच्याकडे निवेदन दिले. सध्या कोरोनामुळे सर्व सामान्य नागरिक आणि मंजूर वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. लॉक डाऊन मुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती असलेले नागरिक त्रस्त झाले आहे. जगायचे कसे असा प्रश्न यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर उपस्थित झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली.म्हणून एक वर्षाचा पाणी पट्टी कर, घर पट्टी कर माफ करण्यात यावे अशी मागणी नवतळा येथील ग्रामसेवक यांना निवेदनातून केली.यावेळी शुभम पारखी , सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा, सुरेश सर्मथ, कुंदन भोयर, फंभु उईके, मुकेश चिलकुलवार , अंकित पारखी, बादल भोयर, अनिल उईके व सर्व युवक काँग्रेसचे आदीं युवा कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!