गोपनीय माहितीच्या आधारे तलाठी यांनी सापळा रचून उमा नदी पात्रात २ रेतीच्या ट्रॅक्टर वर केली कारवाही
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.०१/०६/२०२० रात्री ०१:३० मिनिटांनी शेडेगाव येथील स्मशानभूमीलगत असलेल्या उमा नदी पात्रातून ३ ट्रॅक्टर रेती ची तस्करी करीत आहे अशी गोपनीय माहिती तलाठी यांना मिळताच त्या क्षणी काही तलाठी मिळून सापडा रचून २ ट्रॅक्टर पकडले व १ ट्रॅक्टर पसार झाला असून दोन्ही ट्रॅक्टर चिमूर तहसीलला रात्री २ वाजता जमा करण्यात आली.
या ट्रॅक्टर चे मालक खडसंगी येथील दारू विक्रेते नागेश शामकूळे उर्फ ( माकोडा भाई ) व शेडेगाव येथील ट्रॅक्टर मालक दिनेश मनोहर डांगे यांचे असून हे अनेक दिवसांपासून अवैधरीत्या नेहमी उत्खनन करीत असतात.याबद्दल तलाठी यांना माहिती असतांना सुध्दा अनेक वेळा पसार होण्यात सक्रिय झाले.
व रेती घाट लिलाव झाले नसून अवैध रित्या रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून यावर कारवाही करीत असणाऱ्या तलाठ्याला सुध्दा रेती माफियांकडून मारहाण केली जाते.व महसूल विभाग यावर कुठल्याही प्रकारची सक्ती बाडगत नाही.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जनते कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!