नदीच्या थळीवरील शेतकऱ्याच्या मोटार पंपाची जाळपोळ
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील नेरी येथे नदीच्या थळीवरील मोटार पंप जाळून टाकल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नेरी हल्क्यात संजय नागदेवते यांची धानारी शेतजमीन आहे. सदर शेतीलाओलीत करण्यासाठी शासकीय योजनेतून उमा नदीचे थळीवर क्रुषी पंप लावण्यात आला आहे. गेली अनेक वर्षांपासून ते ऊमा नदीचे घाटावर क्रुषी पंप लावून पंपाद्वारे शेतीला पाणी देवुन शेतीकरित असुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहेत. मात्र काही असामाजिक तत्वाकडुन नदीच्या थळीवरील मोटार पंप जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात मोटार जळली नसुन सेक्शन पाईप पुर्णपणे जळून गेल्याने आर्थिक नुकसान करण्यात आले आहे तसेच या थळीवर मोठा पाट पडल्याने सदर शेतकऱ्याची भुमिगत पाईप लाईन खुली झाल्याने बहुतेक वेळा पाईप फोडुन ठेवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे यासंबंधाने पोलीसात तक्रार देण्यात येणारअसुन अज्ञात आरोपीवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!