चंद्रपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मॅडम!..,चिमूर तालुकाअंतंर्गत गौण खनिज प्रकरणाची चौकशी करायला पाठवल्या,"की,मुजोरी अंतर्गत उडवाउडवीची उत्तरे द्यायला?
बाबू रविंद्र राठोड यांनी चौकशी पथकातील गाडी चालकाच्या खिशात टाकले पैशांचे पॉकेट कशासाठी दिले असावे ?
अनेक ठिकाणी मुरुमाचे उत्खनंन,२ दिवस लागू शकतात संपुर्ण गौण खनिज स्थळाच्या चौकशीला,प्रचंड अनियमितता व प्रचंड अनियमितता अंतर्गत करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची शक्यता ?
प्रकरण थंडबस्त्यात पडण्याची शक्यता,पब्लिक पंचनामा न्युजच्या बातमीला अनुसरून चौकशी!
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुकातंर्गत गौण खनिज उत्खननाच्या बेकायदेशीर व अयोग्य प्रकरणाची बातमी,"पब्लिक पंचनामा न्युज,मध्ये दोन दिवसा अगोदर प्रकाशित होताच,चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज चिमूर तालुक्यात दोन सदस्यीय समिती गौण खनिज उत्खनन स्थळांची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी पाठविले.
परंतू हे दोन सदस्यीय चौकशी समिती सदस्य वारंवार बेताल व बेकायदेशीर बोलून वेळ मारुन नेत असल्याचे दिसले.यामुळे चौकशी समितीचे सदर दोन्ही सदस्य गौण खनिज उत्खनन स्थळांची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी येण्यापेक्षा वेळ मारुन नेण्यासाठीच आले असल्याचे त्यांच्या बेताल कृतीतून व बेताल बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
म्हणूनच म्हणावेसे वाटते,अतिरिक्त जिल्हाधिकारी मॅडम,चिमूर तालुक्यातंर्गत गौण खनिज उत्खननाच्या सबंधात चौकशी करायला त्या दोघांना पाठविल्या,"कि,उडवाउडवीची उत्तरे द्यायला?"की,गौण खनिज उत्खनना अंतर्गत करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारांचे प्रकरण थंडबस्त्यात पाडायला?
तुमच्या बातमीला अनुसरून आम्ही चंद्रपूर वरुन गौण खनिज उत्खनन स्थळांची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी आलो आहे,आपण चिमूर मध्ये यावे.
दखल न्युजचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांना काॅल येताच अाम्ही चिमूरकडे आपल्या टीम सोबत रवाना झाले व मुरुम गौण खनिज उत्खननाच्या,मौजा चक कवडसी मानुसमारी,येथील स्थळावर त्यांना घेवून गेले.
रमेश कवडू नन्नावरे व इतर यांच्या शेतातील मुरुम उत्खनंनाच्या स्थळांची मोजनी करताकरताच दिवस गळायला लागला.जवळपास दोन एकराच्या पट्यात मुरुम तस्करांनी मुरुमाचे उत्खनन केले असल्याचे प्रत्यक्ष मोका चौकशी वरुन लक्षात आले.
रमेश कवडू नन्नावरे हे नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक ९,गोंडमौला चिमूर येथील रहिवासी आहेत.शेतीचा भुमापण क्रमांक १८ असल्याचे त्यांच्या पुतण्यानी सांगितले.
मात्र, भौगोलिक माहिती प्रणाली साहाय्यक ए.एन.खडेकर व खनी निरिक्षक बि.वाय.वरखडे हे उत्खनंनाच्या स्थळांची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी आले असता,त्यांनी संबंधीत तलाठी,सबंधीत बाबू व शेतकरी यांना मोका स्थळावर का म्हणून बोलावले नाही?हा प्रश्न गंभीरता निर्माण करतो आहे.
याच बरोबर तहसील कार्यालय चिमूर येथून,त्यांनी मोका चौकशी स्थळावर जाताना,सर्व मुरुम उत्खनंनाच्या स्थळांचे रेकार्ड सोबत का म्हणून घेतले नाही?हा त्यांच्यावर व त्यांच्या चौकशी तपासावर शंका निर्माण करणारा प्रश्न निर्माण होतो आहे.
चिमूर तालुक्यात गौण खनिज उत्खननाच्या स्थळांची पाहणी करण्यासाठी,चंद्रपूर जिल्हाधिकारी जिल्हा खनिकर्म कार्यालय येथील,भौगोलिक माहिती प्रणाली साहाय्यक ए.एन.खेडकर व खनी निरिक्षक बी.वाय.वरखेडे येणार याची माहिती मुरुम तस्करांना होताच,चिमूर तालुक्यातील सर्व मुरुम तस्कर अर्लट झाले व आपापली वाहणे जागा मिळेल त्या ठिकाणी लावून शांत बसले होते.
चौकशीसाठी चंद्रपूर वरुन चौकशी पथक येणार याची माहिती मुरुम तस्करांना कोणी दिली? हा मुद्दा सुध्दा भयंकर गंभीरता निर्माण करतो आहे.
राजस्थान राज्यातील पासिंग असलेल्या खाजगी चारचाकी वाहनाचा चालक मात्र भयंकर शार्प दिमाखाचा दिसला,तो एवढा घुमवत होता की आम्ही त्याला जसे काही पागल दिसलो.
रेतीचे साठवणूक स्थळे दाखवा आम्ही तात्काळ कारवाई करतो म्हणणारे हे दोन्ही सदस्य रेतीचे साठवणूक स्थळे दाखवताच,"सरड्यासारखे रंग बदलवू लागले व चूप झाले.
मुरुम गौण खनिज उत्खननाचे केवळ एक स्थळ या दोन्ही सदस्यांनी बघीतले व त्या स्थळांचे मोजमाप करुन परतले.परतांना मात्र चिमूर तहसीलच्या सबंधीत रविंद्र राठोड या बाबूनी,मॅडम नी आणलेल्या खाजगी चारचाकी वाहनांच्या चालकांच्या खिशात क्षणाचाही विलंब न करता रुपये टाकले!ते रुपये कशासाठी दिले?हा मुद्दा सुध्दा प्रकरणाला गरम करतो आहे.मॅडमच्या चालकाला रविंद्र राठोड बाबू रुपये देतानाचे साक्षदार आहेतच.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मॅडम,चिमूर तालुक्यातील गौण खनिज उत्खननाच्या सर्व स्थळांची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र तज्ञांचे चौकशी पथक नेमावे व सर्व गौण खनिज उत्खननाच्या स्थळांची कागदपत्रांना अनुसरून सखोल चौकशी करावी.तूर्त एवढेच!








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!