आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत अन्नधान्याचे वितरण आजपासून सुरू .
आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत हिरापूर येथे मोफत अन्नधान्याचे वितरण आजपासून सुरू करण्यात आले.
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून दोन कि.मी. जवळच असलेल्या हिरापूर येथे लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत,ज्या कुटुंबाकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजने अंतर्गत कोणतीही शिधापत्रिका नाही,ज्यांना अन्नधान्याची गरज आहे,असे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल,विस्थापित मजूर,रोजंदारी मजूर, गरीब व शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधी करीता प्रति व्यक्ती महिना 5 किलो तांदूळ मोफत वितरित करण्याचे निर्देश सरकार ने दिले आहेत
प्रत्येक व्यक्ती माहे मे व जून याप्रमाणे 10 किल्लो तांदूळ व प्रति कुटुंब 2 किल्लो चना वितरित होणार आहे..
त्या अनुसंघाने हिरापूर येथे मोफत धान्य वितरणाला सुरुवात करण्यात आली असुन
उपस्थित महेंद्र पंचवटे ग्रा.पं. सदस्य हिरापूर,मनोज सोगलकर सामाजिक कार्यकर्ता,डोमेन्द्र बावनकर स्वस्त धान्य दुकानदार,दिलीप खडसे,बाळा चंदनबावने व इतर लाभार्थी उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!