विद्यार्थ्यांच्या हिताचा,जिविताचा आणि मानसिकतेचा सर्वांगीण विचार करून परीक्षा रद्द करावी ATKT,YT आणि backlog च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत - अभिजित कुडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका



वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - सध्या महाराष्ट्रातील कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे.सर्व व्यवसाय व व्यवस्था ठप्प असल्याने राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे.विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपण परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी केली.

या परिस्थितीत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक भविष्याची चिंता सतावत आहे.त्याचबरोबर ATKT ,YD आणि Backlogs च्या प्रश्र्नांची टांगती तलवार आम्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर लटकत आहे.या सर्व घडामोडी घडत असताना विद्यार्थ्यांची ढासळणारी मानसिकता सुद्धा लक्षात घेऊन आपण निर्णय घ्यावा.दिवसेंदिवस भयानक होत चाललेली कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना प्रमोट करून नैतिक मार्गातून न्याय मिळावा.

जर वरीलप्रमाणे परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर विद्यार्थी आक्रमक होऊन कायदा सुव्यवस्था अडथळा निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? जर परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर परीक्षे दरम्यान विद्यार्थांना covid–19 ची लागण झाल्यास त्याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांची जीवित हानी झाल्यास आपण पूर्व नियोजन महाराष्ट्रात जाहीर केले आहे का? जर या परिस्थितीतही परीक्षा रद्द करणार नसाल तर १० लाख विद्यार्थांना नोकरी देण्याची लेखी हमी जाहीर केली आहे का? 

आपण सामान्य नागरिक आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या विचार करून आपल्या सद्विवेक बुद्धीने वरीलप्रमाणे परिक्षा रद्द कराल आशी आशा बाळगत.असे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, माननीय राज्यपाल महोदय, माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय यांना mail द्वारे निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!