तोंडावर मास्क न घालणाऱ्या जनते विरुद्ध वरोरा पोलिसांची कार्यवाही.
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - जगात थैमान घातलेल्या कोरोनाव्हायरस मुळे सर्वजण परिस्थितीशी आपल्यापरीने झुंज देत आहे. जगात पसरलेल्या या व्हायरसमुळे मानवी जीवन विस्कळित झाले आहे. अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. तर अनेकांनी या महामारीमुळे आपले जीव गमावले आहे. covid-19 या महामारी च्या पार्श्वभूमीवर सरकारने तोंडावर मास्क घालने अनिवार्य केले आहे. तरी पण काही लोक मास्कचा उपयोग करताना दिसत नसल्या कारणाने नाईलाजास्तव शासनाला कधी कधी कठोर पावले उचलावी लागतात. शहरात मास्कचा वापर न करणाऱ्या विरुद्ध पोलिस प्रशासनाने दिनांक. 16 जून रोजी दुपारी 11 : 30 वाजता शहीद स्मारक चौक आणि रत्नमाला चौक या दोन ठिकाणी लोकांवर कार्यवाही करून प्रत्येक व्यक्तीकडून 200 /- रुपये प्रमाणे नगरपालिकेची साधारण पावती द्वारे दंड वसूल करण्यात आले व त्यांना मास्क चे वाटप करण्यात आले आहे. या कार्यवाही स्वरूप एकूण 63 लोकांवर कार्यवाही दरम्यान एकूण 12600 /- रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे, आणि विशेष म्हणजे ही रक्कम स्थानीय नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली आहे. सदर कार्यवाही उमेश पाटील पोलीस निरीक्षक वरोरा, यांच्या मार्गदर्शनात सतीश सोनटक्के एपीआय, राहुल किटे एपीआय, निखिल कौरासे, मोहन निषाद, भुनेश्वर तेलंग, अनुप नाईक यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!