बस सेवे अभावी दैनंदीन कामे रखडली

बस सेवे अभावी दैनंदीन कामे रखडली

बस सेवा सुरू करण्याची मागनी

बस सेवेचा निराधार वृद्धाना फटका

शेतकर्यांना शेतीविषयक साहित्य वाहतुक करण्याची पंचाईत

खाजगी वाहनाने शेतकर्यांवर आर्थिक भुदंड


जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही प्रतीनिधी):+
बस सेवे अभावी ग्रामिण भागातील दैनंदीन कामे रखडली असुन त्याचा सर्वाधीक फटका निराधार वृद्धाना व शेतकर्यांना बसलेला आहे. बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागनी ग्रामिण भागातील नागरीक करीत आहेत.
दिर्घ काळ बस सुविधा बंद असल्याने ग्रामिण भागातील जनजिवन विस्कळीत झाले आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव होवू नये म्हनुन संचारबंदी ,लाकडाउन करण्यात आले.
पावसापुर्वी लाकडाउन संपुष्टात येईल व जनजिवन सुरळीत होईल अशी प्रत्येकाची आशा होती. परंतु दिवसेंदिवस कोरोना रूग्न वाढत असल्याने लाकडाउन संपन्याचे नावच घेत नसल्याने ग्रामिण भागातील नागरीक प्रभावीत झाले आहेत.
दिर्घकाळ लाकडाउन करण्यात आल्याने याचा सर्वाधिक फटका निराधार वृद्धाना, निराधार महिलांना, व वाहतुकीचे साधन नसलेल्या शेतकर्यांना व सर्वसामान्य नागरीकांना बसलेला आहे.
आता सर्व व्यवहार बैंकेतुनच करावे लागते . शेतीचे धान विकला तर बैंकेत पैसे, निराधार योजनेचे बैंकेत पैसे, घरकूल चे बैकेत पैसे, शौचालयाचे बैंकेत पैसे, गुरांच्या गोठ्याचे बैकेत पैसे, रोजगार हमीचे बैंकेत पैसे यासारखे सर्व पैशाचे व्यवहार बैंकेतुनच करावे लागते.
सर्वच बैंका ग्रामिण भागातील खेड्यात नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रीयकृत बैंकामधुनच हे व्यवहार होत असतात. राष्ट्रीय बैंका खेड्यात नाही आहेत. हे बैंका तालुकास्तरावरच आहेत. सद्युपरीस्थिती मध्ये तालुक्याच्या ठिकाणी जाने अवघड झाले आहे.
बस सुविधा नसल्याने वा वाहतुकीचे साधने उपलब्ध नसल्याने ग्रामिण भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत.
निराधार वृद्धांची परीस्थिती फार बिकट आहे. निराधार योजनेचे बैकेत महिन्याचे पैसे काढने अवघड झाले आहे. खाजगी वाहनेही चालू नसल्याने बैंकेत जावे कसे असा प्रश्न पडलेला आहे.
पावसाच्या दिवसात अनेक साहित्याची जुळवा जुळव करावी लागते . कपडा लत्ता घ्यावे लागते. संसारपयोगी साहित्य घ्यावं लागते. पैसा नसेल तर काय करावं या विवंचनेत ग्रामिण भागातील निराधार वृद्ध महिला व पुरूष जिवन कंठीत आहेत. खाजगी वाहनाचावापर केला तर अधीक पैसा मोजावे लागते. बस सुविधा मध्ये अर्ध्या तिकीट मध्ये जायला मिळत होते . पण आता तसे नसल्याने गैर सोय होत आहे.
पावसाच्या दिवसात शेतकर्यांना शेतीउपयोगी साहित्य खरेदी करावं लागते. तेही तालुक्याच्या ठिकाणातुनच. सर्वच शेतकरी सधन नाहीत . बसेस वर अनेक शेतकरी शेतीचे साहित्य ने- आन करतात. अनेक गरीब शेतकर्यांना बस हीच सुविधा योग्य वाटते. बसमधुनच बि बियाने आनली जातात. परंतु यावर्षी बससुविधा नसल्याने  अनेक शेतकर्यांना शेतीपयोगी साहित्य आनने अवघड झाले आहे.
    खाजगी वाहनाच्या अव्वाच्या सव्वा भावाने लूट करीत आहेत. पर्याय नसल्याने खाजगी वाहनातुनच शेतीचे साहित्य आनावे लागत आहे. असे चित्र ग्रामिण भागात निर्माण झाले आहे. 
   दरम्याण बस सुविधा सरू करण्यात यावी अशी मागनी ग्रामिण भागातील नागरीक , शेतकरी ,निराधार महिला ,निराधार वृद्धांकडुन केल्या जात आहे.
   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!