नक्षलाद्यांनी केली युवकाची हत्या, एटापल्ली तालुक्यातील घटना

नक्षलवाद्यांनी एका युवकाची हत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील किद्रीटोला गावाजवळ ही घटना घडली आहे. 

एटापल्ली (प्रतिनिधी) : 
      पोलिस खबर्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती पुढे आली आहे. ही घटना काल ( ता.११) रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) पोलिस मदत केंद्रांतर्गत किदरीटोला गावाजवळ घडली. रवी जुरु पुंगाटी असे मृत युवकाचे नाव असून , तो गुंडजूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ११ वाजताच्या सुमारास सशत्र नक्षली रवी पुंगाटीच्या घरी गेले. त्यांनी रवीला गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. नक्षल्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठीही टाकली असून, त्यात रवी पोलिसांचा खबर्या असल्याचा संशय घेतला आहे . या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!