पब्लिक पंचनामाच्या त्या बातमीची नगरसेवक महेंद्र करकाळे यांनी घेतली दखल
पब्लिक पंचनामाच्या त्या बातमीची नगरसेवक महेंद्र करकाळे यांनी घेतली दखल
मुल (प्रतिनिधी)
"मुल नगर परिषदेच्या असंवेदनशीलतेचा सेवानिवृत्त शिक्षकांचा फटका" या मथळ्याखाली पब्लिक पंचनामा मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल त्या प्रभागाचे नगरसेवक महेंद्र करकाळे यांनी तातडीने घेतले असून,ह संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्याची पाहणी केली आणि आठ दिवसात या कामाला सुरुवात होईल याची खात्री त्यांनी श्री. वसंतराव जिंरकुंटवार सेवानिवृत्त शिक्षक यांना दिली.
मुल नगर परिषदेने वार्ड क्रमांक १५ मध्ये वसंतराव जिरकुंवार यांच्या घरासमोरील रस्ता अर्धवट बांधला, त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षापासून हे काम करण्याचे मुख्याधिकारी यांनी मान्य केले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. याबाबतची बातमी पब्लिक पंचनामा मध्ये प्रकाशित करण्यात आली. या बातमीची दखल नगरसेवक करकाडे यांनी घेतल्याने जिरकुंटवार यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, शहर भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी देखील त्यांच्याशी संपर्क करून हे काम तातडीने करण्यात येईल असे सांगत संबंधितांना धारेवर धरले. काल नगरसेवक कडकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन कामाची पाहणी केली. पब्लिक पंचनामा मध्ये बातमी प्रकाशित झाल्याने प्रलंबित प्रकरणाला वाचा फुटली त्याबद्दल त्यांनी पब्लिक पंचनामा चे आभार मानले. प्रभाकर भोयार आणि महेंद्र करकाळे यांनी आश्वस्त केल्यामुळे हे काम गतीने होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!