बाप विहिरीचे पाणी काढत असतांना ८ महिन्याच्या रुबिनाचे विहिरीत पडून मृत्यू
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक.१२ जून २०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या अडेगाव देश येथे घरामध्ये बायकोच्या वादावरून रागात येऊन गावाशेजारी ५० मीटर अंतरावरील बदके यांच्या शेतातील विहिरीचे पाणी काढण्यासाठी मुलीला विहिरीच्या बाजूला ठेवून पाणी काढत असतांना ८ महिन्याच्या रुबिनाने विहिर भु - सपाट असल्याने विहिरीत डोकावून बघत असता मुलगी विहिरीत पडली व बापाचे लक्ष पाणी काढण्याकडे होते मुलीला बचावण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली व मुलीला बाहेर काढण्याच्या काटकसरीत मुलगी दगावली असता.
अडेगाव देश येथील गावकऱ्यांना माहिती मिळताचक्षणी विहिरीकडे धाव घेतली व दोराच्या सहाय्याने मुलीच्या बापाला बाहेर काढले.व ८ महिन्याची मुलगी दगावली असून उडी घेणाऱ्या बापाचे नाव संघपाल कवडू गजभिये वय ३२ वर्षे हे बचावले आहे. मृतक मुलिचे नाव रुबिना संघपाल गजभिये वय ८ महिने असे असून हि घटना सकाळी ०९:०० वाजता च्या सुमारास घडली. असून अजूनही मृत्यूचे कारण स्पष्ट व्हायचे आहे. मुलीचे शव शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. व वडलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्निल धुळे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!