राजोलीचे शेतकरी पिक कर्जमाफी पासून वंचित
राजोली (दिनेश घाटे ) :
वि . का . सह . संस्था राजोली ( रजी . न . ९ १३ ) संलग्नित चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बैंक शाखा राजोली यांच्या संयुक्त दरवर्षी प्रमाणे शासकीय नियमानुसार सन २०१७-१८ मध्ये पीककर्ज घेण्यात आला. शासकीय कर्जमाफी योजना
२०१ ९ अंतर्गत २ लाख रुपये पर्यंतची कर्जामाफी झाली. त्यानंतर ३० जून २०१८ ला संस्था व बँक यांनी रुपांतरीत कर्ज मंजूर केला. रुपांतरीत पीककर्ज सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला नाही, परंतु संस्था व बँक यांनी रुपांतरीत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी रुपांतरीत पीककर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांसोबत प्रशासनाकडे सादर केली. त्यामुळे रुपांतरीत पीककर्ज न घेतलेले शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. निदर्शनात आलेली बाब म्हणजे, याच योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया शाखा राजोली येथील लाभान्वित शेतकर्याना सन २०१७-१८ मध्ये घेतलेल्या पीककर्जाची संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बैंक आणि बँक ऑफ इंडिया यांना समान शासकीय नियम लागू होत असताना आही शेतकरी मात्र शासकीय कर्जमाफी योजना २०१९ पासून वंचित असल्याच दुःख आहे. कोरोना महामारीचा संकट असतांनाच आता पावसाळी धान पेरणीचा हंगाम आलेला आहे. करीता प्रशासनाने सहानुभूतीने विचार करून आमचे पीककर्ज माफ करण्याकरीता उचित कार्यवाही करावी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!