लोहार समाजाचे निवेदन.




लोहार समाजाला आर्थिक मदत करा.

लोहार समाज संघटनेची महाराष्ट्र
सरकारला विनंती.




मूल (प्रकाश चलाख)

कोरोणा महामारीच्या परिस्थितीमुळे पारंपारिक लोहार समाजाला व्यवसाय करताना अडचण निर्माण झाल्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.

समाजाच्या दैनाव्यवस्थेला आधार म्हणून शासन स्तरावर योग्य अशी आर्थिक मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी मू ल तालुका लोहार समाजाच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी मूल यांचे मार्फतीने माननीय. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठवून विनंती करण्यात आली आहे.

याप्रसंगी मुल तालुका लोहार
समाज संघटना तालुका अध्यक्ष श्री. गोविंदा सोनटक्के , विजय बावणे सचिव, संतोष सोनवाने तथा लोहार समाज संघटना तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!