सिंचनापासून सावली तालुका वंचित
सिंचनापासून
सावली तालुका वंचित
पालकमंत्री
विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणार काय?
सावली (दिनेश घाटे)सावली पासून हाकेच्या अंतरावर असलेले १ गावे सिंचनापासून वंचित असून, मागील अनेक वर्षापासून या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे आणि सध्या राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करतील काय? असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारीत आहे.
तांबेगडी मेंढा, सायमारा, मुंडाळा,
पेंढरी मक्ता, पांढरसराळ, मेटगांव, चेक मानकापूर, मानकापूर, भारपायली, चारगांव, सादागड,
सादागड हेटी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची गरज आहे. या गावाचे जवळच, असोलामेंढाचे मोठे प्रकल्प आहे,
या प्रकल्पातून लाखो हेक्टर शेतीचे सिंचन करण्याचे
स्वप्न दाखविल्या गेले, मात्र या
तलावाचे जवळच असलेले गावे मात्र वंचित आहे. असोला मेंढा तलावातून सिंचनाची सुविधा केल्यास
सुमारे 3500 हेक्टर जमिन ओलीताखाली येवू शकते.
सध्या शेती लहरी पावसाचे भरोश्यावर असल्यांने अनेक शेतकरी, आपल्या शेती पडित
ठेवित आहे. बडे कास्तकारांनी पाण्यांची स्वत:ची सोय करून घेतल्यांने,
लहान शेतकऱ्यांना मात्र सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. या सर्व गावात मोठया प्रमाणावर आदिवासी शेतकरी आहेत,
हे उल्लेखनीय



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!