आंबोली गावातील पिण्याच्या विहिरी साफ करून उपसा करावा - शुभम मंडपे यांची मागणी



ग्राम पंचायत कार्यालयाला दिले निवेदन

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दि.१२/०६/२०२० ग्राम पंचायत आंबोली ने पिण्याच्या पाण्याच्या विहिरी साफ व उपसा केलेला नाही त्यामुळे गावामध्ये पाणी टंचाई भासत आहे. मात्र याकडे ग्राम पंचायत  आंबोली चे दुर्लक्ष होत आहे ,,, गावामध्ये पाणी टंचाई व   आंबोली वासीयांना होणार त्रास याकडे पाहता  ,,,  पिण्याच्या पाण्याच्या विहिरी साफ व उपसा करण्यात याव्या ,,अशी  मागणी  शुभम मंडपे यांनी  केली आहे.

ग्राम पंचायत आंबोली येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी साफ व उपसा करण्यात यावे करीता ग्राम पंचायत आंबोली ला निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना शुभम मंडपे , व प्रदीप भाषारकर हे उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!