सातारा येथे १०० ब्रास अवैध रेती गावातील वर्दळीच्या रस्त्यावर



चिमूर तालुक्यात रेती माफियांचा सुळसुळाट

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१२/०६/२०२० संपूर्ण विश्वात कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू असून सोशल डिस्टन्स , संचारबंदी , लॉक डाऊन , कलम १४४ , तोंडाला कापडी मास लावणे सक्ती व जमावबंदी असतांना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात रेती माफियांचा मोठ्या प्रमाणात सुळसूळाट सुरू आहे.

जनतेवर पोलीस प्रशासन रोष व्यक्त करीत असतात.व रेती माफियांना खुलेआम रेती वाहतुकिची मुभा का ? सातारा बामनगाव हे गाव गट ग्राम पंचायत असून अगदी सातारा या गावाच्या मध्यभागी १०० ब्रास अवैध रेती चा साठा गोळा करण्यात आला रेती चे ढिग वर्दळीच्या रस्त्यावर टाकले असता गावकऱ्यांना ये जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे.

या रेतीमुळे नाल्या चोकप झाल्या असून जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रेतीचा साठा मोठ्या आसामीचा आहे असे समजते.याबद्दलची माहिती उप विभागीय अधिकारी चिमूर यांना माहिती असता कारवाही का करण्यात आली नाही ? तलाठी कारवाही का करीत नाही.सरपंच तक्रार का महसूल विभागास देत नाही ? ग्राम सेवक शांत का ? जिल्हाधिकारी यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे असे गावकऱ्यांचे मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!