शंकरपूर परिसरात मान्सूनचा दिलासा ....
खरीप पेरणीच्या कामांना आला वेग....
सोशल डिस्टंग ठेवत पेरणीला सुरुवात.....
शेतकऱ्यांमधून समाधान..
शंकरपूर.....(जगदीश पेंदाम)
गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना विषाणू आणि उष्णतेने हैरान झालेल्या परिसरातील नागरिकांना मान्सून पूर्व पावसाने दिलासा दिला, व गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सून पाउस पडत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना समाधान मिळाले असल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे.
गेल्या काही दिवसापासून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून परिसरातील शंकरपूर, हिरापूर, आंबोली, डोमा, नवतळा,मांगलगाव, कवडसी देश, चिचाडा शास्त्री, किटाडी, वाकरला, जवराबोडी,साठगाव कोल्हारी,पांजरेपार,आजगाव,पाचगाव,
खैरी, दहेगाव झरी चकजाटेपार, डोंगरगाव आधी गावात मान्सून बरसला असल्याने या भागातील नागरिक, शेतकरी आनंदी असून सोशल डिस्टन्स ठेवत शेतातील पेरणीच्या कामाला लागले आहेत...
अडिच महिन्यापासून कोरोनामुळे लाँकडावून असल्याने व उष्णतेने नागरिक वैतागून गेले होते दोन-तीन दिवसापासून उन्हाचा पारा कमी झाला असून सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह, ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसत आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरले असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी धान पेरणी, कापूस लागवड,सोयाबीन, तुरीची लागवड सुरू केली आहे...
कोरोणा व उष्णतेमुळे गेल्या अडीच महिन्यात हैराण झालो होतो दोन-तीन दिवसापासून पाऊस झाल्याने समाधान मिळाले आहे आता मजुरामध्ये सोशल डिस्टन्स ठेवत हळूहळू खरिपाची पेरणीला सुरुवात केली आहे.....
शेतकरी शेषराव राऊत शंकरपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!